इंदापूरात ओबीसी एल्गार मेळाव्यातील छगन भुजबळांच्या भाषणातील 10 मुद्दे

इंदापूरात ओबीसी एल्गार मेळाव्यातील छगन भुजबळांच्या भाषणातील 10 मुद्दे

आमचं आरक्षणा धक्का लावू नका एवढं मागितले. त्यात वेगळं काय आहे. आमचे लोक पुढे जात असतील तर ते लोक आमची लायकी काढणार? हे कस चालेल.
Published by :
Team Lokshahi

मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचा तिसरा मेळावा पुण्यातील इंदापूरमध्ये पार पडला आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच अनेक मुद्द्यांवर देखील भाष्य केलं आहे.

छगन भुजबळांच्या भाषणातील 10 मुद्दे

1. सराटी येथे झालेला हल्ला नक्की कोणी घडवून आणला? सराटी येथे झालेल्या हल्ल्याची बाजू जर अगोदर समोर आली असती तर जरांगे याला एवढी सहानभूती मिळाली असती का? केवळ एक बाजू समोर आल्याने याला सहानुभूती मिळाली.

2. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही त्यांच्या होणाऱ्या हुकूमशाहीला आहे.

3. पोलिसांनी देखील बघ्याची भूमीका करू नये? अन्यथा पुढे काय होईल याची जबाबदारी कुणावर?

4. ओबीसीमध्ये देखील अतिमागास आहेत, त्यांना सेफ करून ठेवला आहे. यात २७४ जातीमध्ये इतर १७ टक्के आरक्षण उरलं आहे. ओबीसी आरक्षण भरून आम्हाला नोकऱ्या द्या आणि मग बाकीच काय करायचं आहे ते करा.

5. लोकसेवा आयोगात 85 टक्के मराठा समाज, सारथी अंतर्गत 80 कोटी अण्णासाहेब महामंडळ 5160 कोटी दिले. जे मराठा समाजाला दिले ते आम्हाला द्या एवढीच आमची रास्त मागणी आहे.

6. आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढं मागितले. त्यात वेगळं काय आहे. आमचे लोक पुढे जात असतील तर ते लोकं आमची लायकी काढणार? हे कस चालेल.

7. जरांगेंनी साध ग्रामपंचायत सरपंच होऊन दाखवावं. उगीच अशा लोकांना मोठं केलं जातं.

8. गावबंदी...एकीकडे ओबीसी नेत्यांना गावबंदी आणि दुसरीकडे रोहित पवारांचा बॅनर लागला त्याला कशी गावबंदी मग? मग एकाच पक्षाला गावबंदी का? मी पोलिसांना सांगितले सगळे गावबंदीचे बॅनर काढायला सांगितले आहेत. मात्र अद्यापही ते काढले जात नाहीत.

9. एकाला वेगळा तर दुसऱ्याला वेगळा न्याय का? त्यांना सगळी मुभा आहे का? हा कसला न्याय आहे.

10. आमचा संयम संपवू देऊ नका,अन्यथा मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com