Manipur News : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात चकमक; चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा

मणिपूर चंदेल जिल्ह्यातील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
Published by :
Prachi Nate

भारत पाकिस्तानच्या तणावाला आता कुठे शांतता मिळालेली असताना आता मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात डोंगराळ भागात भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चकमक झाली आहे. आसाम रायफल्सच्या जवानांकडून 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार करणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com