बेस्ट ऑफ लक! आजपासून दहावीच्या परीक्षेला  सुरुवात

बेस्ट ऑफ लक! आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे.

सकाळी 11 वाजता दहावीचा पहिला पेपर असणार असून परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले आहेत.आज होणाऱ्या दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी राहणार असून यासोबतच राज्यातील 701 केंद्रांतील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com