Buldhana Paper Leak : बारावी गणित पेपरफुटीप्रकरण; चार आरोपी शिक्षकांचं निलंबन

Buldhana Paper Leak : बारावी गणित पेपरफुटीप्रकरण; चार आरोपी शिक्षकांचं निलंबन

बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत. बुलढाणा येथे सिंधखेड तालुक्यातील एका शाळेत गणिताचा पेपेर फुटला. गणिताच्या पेपरची दोन पाने व्हॉटसअपवर व्हायरल झाला होती. या प्रकरणात चार शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे. बुलढाणा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ही कारवाई केली आहे.

या प्रकरणात हे चार शिक्षक आणि कॉपी पुरवण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या बाहेरच्या तीन जणांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणाचा तपास पुढे सुरु आहे. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

चार आरोपी शिक्षकांच निलंबन करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com