ताज्या बातम्या
Walmik Karad : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडची आज बीड कोर्टात सुनावणी झाली.
वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयाने वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडची आज बीड कोर्टात सुनावणी झाली. खंडणी व मकोका या दोन्ही गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराडला आत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून जामीनासाठी अर्ज करता येऊ शकतो.