Pakistan Accident : पाकिस्तानमध्ये खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pakistan Accident) पाकिस्तानमध्ये खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 जणांचा मृत्यू 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

हे खेळाडू एका क्रीडा स्पर्धेतील विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी बसने लाहोरच्या दिशेने निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Summary

  • पाकिस्तानमध्ये भीषण अपघात

  • खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक

  • 15 जणांचा मृत्यू

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com