Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानातून 167 कर्मचाऱ्यांना काढलं; 167 मध्ये सर्वाधिक 114 मुस्लिम कर्मचारी
शनिशिंगणापूर येथील शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने महत्त्वपूर्ण निर्णय घेत 167 कर्मचाऱ्यांना कामावरून सेवामुक्त केले आहे. यामध्ये 114 मुस्लिम कर्मचारी असून, उर्वरित इतर कर्मचारी आहेत. हा निर्णय मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आलेल्या इशारामुळे मंदिर व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे. भविष्यात कुठलेही वादाचे प्रसंग निर्माण होऊ नये याची काळजी या निर्णयातून घेण्यात आली आहे.
ट्रस्टकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या मुख्य परिसरात कुठल्याही मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. संबंधित कर्मचारी मंदिर परिसराला लागून असलेल्या इतर सहाय्यक सेवांमध्ये कार्यरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही हिंदू संघटनांनी यास तीव्र आक्षेप घेत आंदोलनाची चेतावणी दिली होती.
यावर ट्रस्टने स्पष्ट भूमिका मांडून अनेक कर्मचारी आधीपासूनच कामावर अनुपस्थित असल्याचेही सांगितले. त्यामुळे विविध बाबींचा विचार करून, आज एकूण 167 कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.