क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा
Admin

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा

सातारा जिल्ह्यातील नायगाव खंडाळा येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय..
Published by :
Siddhi Naringrekar

सातारा जिल्ह्यातील नायगाव खंडाळा येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.. सकाळी साडे आठ वाजता दिंडीला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. तसंच या कार्यक्रमाला  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, अतुल सावेही उपस्थिती लावणार आहेत.   

स्त्री शिक्षणाचे जनक आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती साजरी होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नायगाव येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. कार्यक्रमाच्या वेळेमध्ये बदल झाला असून दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com