Big Breaking! राणी बागेतील 2 वाघांचा मृत्यू-सूत्र
(Byculla Rani Baug) भायखळ्याच्या राणी बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्राणिसंग्रहालयात 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयातून 'शक्ती' वाघ आणण्यात आला असून तो आता तो दहा वर्षांचा होता. उद्यान प्रशासनाने केलेल्या नैसर्गिक अधिवासात तो राहत होता. या वाघाला अपस्माराचे झटके आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज उद्यान प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
17 नोव्हेंबरला वाघाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने आणि नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता मोठी अपडेट समोर आली आहे. राणी बागेतील 2 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. शक्ती व रुद्र या दोन वाघांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ निर्माण झाली आहे. या वाघांचा नेमका मृत्यू कसा झाला. यांची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे. प्रशासनाकडून मात्र वाघांच्या मृत्यूवर चुप्पी मिळत आहे.
