Ashadhi Wari 2025: दिंडयांना २० हजार अनुदान; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा ...Ashadhi Wari 2025: दिंडयांना २० हजार अनुदान; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा ...
ताज्या बातम्या
Ashadhi Wari 2025: दिंडयांना 20 हजार अनुदान; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा ...
उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वारकरी दिंड्यांना अनुदान; सामाजिक न्याय विभागाची भूमिका
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा सोहळा असलेल्या आषाढी वारीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा प्रस्थानपूर्वी प्रत्येक वारकरी दिंडीला 20,000 रुपयांचे अनुदान दिले जाणार असून याचा लाभ संपूर्ण राज्यातून पंढरपूरकडे निघणाऱ्या हजारो दिंड्यांना मिळणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुदान वाटप सदर अनुदान सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी, तब्बल 15000 दिंड्यांना 3 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं होतं. तसाच उपक्रम यंदाही राबवण्यात येणार आहे.