Suicide News
Suicide NewsTeam Lokshahi

मोबाईल वापरण्यास भावानं विरोध केला; 18 वर्षीय बहिणीची आत्महत्या

मोबाईलचा अति वापर करत असल्यानं भावाने मोबाईल हिसकावून घेतला होता.
Published by :
Sudhir Kakde

कल्याण | सुरेश काटे : मोबाईल ही आज काही अपवाद वगळता प्रत्येकाच्याच जीवनातली अविभाज्य गोष्ट झाली आहे. अनेकांना मोबाईलचं व्यसन लागल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता कल्याण मधून एक धक्कादायक घटना समोर आली. मोबाईलचा वापर हा किती धोकादयक ठरु शकतो हे या घटनेवरुन दिसून येतं. बहीण जास्त वेळ मोबाईल मध्ये व्यस्त असल्याने भावाने मोबाईल काढून घेतल्याने बहिणीने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीतील शेलार नाका परिसरात घडली आहे. लहान बहीण मोबाईलवर जास्त वेळ असल्याने मोठ्या भावाने ओरडुन मोबाईल सिमकार्ड काढला. त्यानंतर किरण शिवदास सहानी या 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide News
पुणे हादरलं! दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 10 जणांचा बुडून मृत्यू

मयत किरण ही नेहमी मोबाईलवर वापरत असायची. त्यामूळे तिच्या मोठ्या भावाने जास्त मोबाईल बघू नकोस असे सांगत तिच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून घेतले आणि तो बाजूच्या घरात गेला. त्यानंतर काही वेळातच तिने आत्महत्या केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com