Avinash Bhosale
Avinash BhosaleTeam Lokshahi

अविनाश भोसले 30 मे पर्यंत नजर कैदेत; CBI कोर्टाचा निर्णय

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयने DHFL घोटाळा प्रकरणात अटक केली आहे.
Published by :
Sudhir Kakde

मुंबई | केदार शिंत्रे : राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणांच्या (Central Agencies) कारवायांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे. राजकीय मंडळींसोबतच पुण्यातील बड्या उद्योगपतीवर सीबीआयनं कारवाई केली आहे. पुण्यातील (Pune) प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर 30 मे पर्यंत त्यांच्या वरळीच्या घरी त्यांना नजरकैदेत ठेवावं असे आदेश न्यायालयाने दिले आहे. CBI कोर्टाचे न्यायाधीश शिंगाडे यांनी हा निर्णय दिला.

Avinash Bhosale
"...म्हणून शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात जाणं टाळलं"; कार्यकर्त्यांची माहिती

अविनाश भोसले यांच्या कोठडीवर कोर्टाच्या वेळेअभावी आज निर्णय होऊ शकला नाही. या दरम्यान वकील आणि परिवारातील एक सदस्यच भोसले यांना भेटू शकणार आहे. 30 मेपर्यंत CBI अविनाश भोसले यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, या दरम्यान CBI आपलं उत्तर दाखल करणार आहे. CBI गेस्ट हाऊसमध्ये अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवणार आहेत. सीबीआयकडून 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र भोसलेवर करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकीलांनी रिमांडला विरोध केला. भोसलेंना वरळी येथील घरी किंवा सेंट रेजिस पंचताराकिंत हाॅटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यावर सीबीआयकडून भोसलेंना बीकेसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवत त्यांना सर्व जेवण, मेडिकल सुविधा देण्याची तयारी दर्शवली. तसेच 28 आणि 29 मे रोजी एक तास 5 ते 6 या वेळेत त्यांचे वकिल विजय अग्रवाल व धवल मेहता यांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

Avinash Bhosale
"आर्यन खानला क्लीन चिट, आता समीर वानखेडेंवर..."; मलिकांच्या कार्यालयातून ट्विट

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com