उरणमध्ये प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या; हत्याकांडप्रकरणी लव्ह जिहादचा आरोप

उरणमध्ये प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या; हत्याकांडप्रकरणी लव्ह जिहादचा आरोप

यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली. यशश्रीची हत्या लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली. यशश्रीची हत्या लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. त्या दिवशी यशश्री सकाळी 11 वाजता मैत्रीणीकडे गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. थेट तिचा मृतदेहच उरण रेल्वे स्टेशनजवळ सापडला असल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. ती बेलापूरला नोकरीला होती. हाफ डे घेऊन ती कामावरून लवकर निघाली होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहे. एक पथक कर्नाटकात गेलं आहे.

दरम्यान प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आल्यानंतर या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी आरोपीवर 2019 मध्ये हल्लाही केला होता. यशश्री शिंदे आणि दाऊद शेख प्रेमसंबंधात असल्याचं तिच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांनी दाऊद शेखवर प्राणघातक हल्ला केला होता, असं पोलिसांनी सांगितलं. दाऊद शेख हा संशयित आरोपी यशश्री शिंदे हिला गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून ओळखत होता. 7 वर्षांपूवी लैंगिक अत्याचार केला होता अशी माहिती आहे आणि आता जेलमधून सुटल्यावर खून केला. हत्येपूर्वी दाऊदनं तरुणीचा निर्घृण छळ केला.

2019 मध्ये उरणमध्ये मजूर म्हणून काम करत असताना त्यांची ओळख झाली. मुलीच्या घरच्यांना त्यांच्या मैत्रीबद्दल कळल्यानंतर वडिलांनी त्याच्यावर हल्ला केला होता. तसंच, त्याच्याविरोधात यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण करणाऱ्या पोस्को कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल केला होता, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com