Mumbai Local: पश्चिम रेल्वे प्रवाशांना दहा दिवस मनस्तापाचे; 27 ऑक्टोबरपासून तब्बल 2500 लोकल ट्रेनच्या फेऱ्या रद्द

Mumbai Local: पश्चिम रेल्वे प्रवाशांना दहा दिवस मनस्तापाचे; 27 ऑक्टोबरपासून तब्बल 2500 लोकल ट्रेनच्या फेऱ्या रद्द

तुम्ही सुद्धा लोकलने ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, पश्चिम रेल्वेने 11 दिवसांचा ब्लॉक घेण्याचं जाहीर केलं असून त्या काळात 2500 हून अधिक लोकल ट्रेन्स रद्द करण्याची घोणषा करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. तुम्ही सुद्धा लोकलने ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, पश्चिम रेल्वेने 11 दिवसांचा ब्लॉक घेण्याचं जाहीर केलं असून त्या काळात 2500 हून अधिक लोकल ट्रेन्स रद्द करण्याची घोणषा करण्यात आली आहे.

चार आणि पाच तारखेला म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडून 24 तासांचा एक जम्बो मेगाब्लॉक देखील घेण्यात येईल. त्यामुळे 5 तारखेपर्यंत पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गीकेचे काम सुरू करण्यात येत आहे. या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील तब्बल 2500 हून अधिक लोकल ट्रेन्सच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 27 ऑक्टोबर पासून ते 5 नोव्हेंबर दरम्यान या लोकलच्या फेऱ्या रद्द ठेवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेकडून वांद्रे आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सहाव्या लाईनचं काम सुरू होत आहे. या कामामुळे 2500 हून अधिक लोकल ट्रेन्स, 43 मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

विरारच्या दिशेने जाणाऱ्या कधी आणि किती लोकल ट्रेन्स रद्द

27 आणि 28 ऑक्टोबर - 129 ट्रेन्स रद्द

29 ऑक्टोबर - 116 ट्रेन्स रद्द

30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर - 158 ट्रेन्स रद्द

4 नोव्हेंबर - 46 ट्रेन्स रद्द

5 नोव्हेंबर - 54 ट्रेन्स रद्द

चर्चगेटकडे जाणाऱ्या कधी आणि किती लोकल ट्रेन्स रद्द

27 आणि 28 ऑक्टोबर - 127 लोकल ट्रेन्स रद्द

29 ऑक्टोबर - 114 लोकल ट्रेन्स रद्द

30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर - 158 ट्रेन्स रद्द

4 नोव्हेंबर - 47 लोकल ट्रेन्स रद्द

5 नोव्हेंबर - 46 ट्रेन्स रद्द

विरारच्या दिशेने जाणाऱ्या तब्बल 1271 लोकल ट्रेन्सच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या 1254 लोकल ट्रेन्सच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com