सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींचा आज फैसला

सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींचा आज फैसला

सातारा जिल्ह्यात चुरशीने मतदान झालेल्या 259 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

सातारा जिल्ह्यात चुरशीने मतदान झालेल्या 259 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत संख्या, वार्ड आणि मतदान केंद्र यावर मतमोजणी फेऱ्या अवलंबून आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर दोन ते तीन तासात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणी ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज देखील झाले आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदारांच्या अनुपस्थितीत विजयाचा गुलाल कोणाला लागणार याची उत्सुकता लागली आहे.

सरपंच आणि सदस्य पदासाठी रणांगणात उतरलेल्या सुमारे 4 हजार 542 उमेदवारांची नशीब आज मतपेटीतून बाहेर येणार आहे.. 4 लाख 43 हजार 319 मतदारांपैकी 3 लाख 55 हजार 254 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.. जिल्ह्यात 926 मतदान केंद्रांवर 80.14 टक्के मतदान झाले असून मतदानाचा वाढलेला आकडा कोणाच्या बाजूने कौल देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. आजच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून काही ग्रामपंचायतींचे निकाल दोन तासात जाहीर होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वादाची प्रसंग उद्भवू नये यासाठी ग्रामपंचायत निवडणूक निकाल लवकर जाहीर व्हावेत यासाठी प्रशासन देखील प्रयत्नशील आहे.

सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 259 ग्रामपंचायतीची मतदानाची आकडेवारी टक्केवारीत

सातारा तालुका 29 ग्रामपंचायतींसाठी 79.94 टक्के मतदान झाले

कराड तालुका 33 ग्रामपंचायतींसाठी 83.32 टक्के मतदान झाले

पाटण तालुका 71 ग्रामपंचायतींसाठी 78.69 टक्के मतदान झाले

कोरेगाव तालुका 43 ग्रामपंचायतींसाठी 81.43 टक्के मतदान झाले

वाई तालुका 7 ग्रामपंचायतींसाठी 79.88 टक्के मतदान झाले

खंडाळा तालुका 2 ग्रामपंचायतींसाठी 76.70 टक्के मतदान झाले

महाबळेश्वर तालुका 3 ग्रामपंचायतींसाठी 71.10 टक्के मतदान झाले

जावली तालुका 11 ग्रामपंचायतींसाठी 78.59 टक्के मतदान झाले

फलटण तालुका 20 ग्रामपंचायतींसाठी 82.07 टक्के मतदान झाले

माण तालुका 28 ग्रामपंचायतींसाठी 78.69 टक्के मतदान झाले

खटाव तालुका 12 ग्रामपंचायतींसाठी 76.43 टक्के मतदान झाले

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com