Blast In High School : स्फोट..., गोंधळ... आणि चेंगराचेंगरी...; ऐन परीक्षेच्या वेळी हायस्कूलमध्ये Blast ! 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 260 जण जखमी

Blast In High School : स्फोट..., गोंधळ... आणि चेंगराचेंगरी...; ऐन परीक्षेच्या वेळी हायस्कूलमध्ये Blast ! 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 260 जण जखमी

मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या राजधानीतील एका हायस्कूलमध्ये झालेल्या स्फोटात आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 29 शाळकरी मुलांनी जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या राजधानीतील एका हायस्कूलमध्ये झालेल्या स्फोटात आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 29 शाळकरी मुलांनी जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच या दुर्घटनेत सुमारे 260 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. त्या देशाच्या राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी बांगुई येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये एका बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा पूर्ववत केला जात असताना हा स्फोट झाला.

आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 16 विद्यार्थिनींसह बहुतेक बळींचा जागीच मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात मृत्यू झाला. मंत्रालयाने सांगितले की, किमान 260 लोकं जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी, सुमारे 5 हजार विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी शाळेत उपस्थित होते.

हेही वाचा

Blast In High School : स्फोट..., गोंधळ... आणि चेंगराचेंगरी...; ऐन परीक्षेच्या वेळी हायस्कूलमध्ये Blast ! 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 260 जण जखमी
Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं अंतराळातून केला लाईव्ह व्हिडिओ; म्हणाला...
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com