ताज्या बातम्या
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 3 तासांचा ब्लॉक
Mumbai-Pune Expressway Block: अलिबाग खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक आज 3 तास बंद असणार आहेत.
Mumbai-Pune Expressway 3 Hours Block: अलिबाग खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक आज 3 तास बंद असणार आहेत. दुपारी 12 ते दुपारी 3 दरम्यान वाहतूक बंद असणार आहे. या कामासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत द्रुतगती महामार्गावरील पुण्याकडील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. खोपोली ते पाली फाटा या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुमारे ५० टन वजनाचे पुलाचे गर्डर बसविण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी द्रुतगती महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यास वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी परवानगी दिली आहे.