Dombivali
Dombivali Team Lokshahi

डोंबिवलीत रेल्वेची संक्षरक भिंत कोसळून 3 जण जखमी, तर दोघांचा मृत्यू

डोंबिवलीतील सिद्धार्थनगर परिसरातील घटना

अमजद खान। कल्याण: डोंबिवलीतील सिद्धार्थनगर परिसरात रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु असताना भिंत कोसळून पाच मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी दोन मजुरांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी तातडीने केडीएमसीचे अग्नीशमन पथक दाखल झाले असून जखमी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Dombivali
भाजप जिल्हाउपाध्यक्षकाचा डोंबिवलीत हैदोस, राष्ट्रवादीचा आरोप

डोंबिवली पश्चिमेतील सिद्धार्थनगर परिसरात रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु होते. संध्याकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान भिंत अचानक कोसळली. यात भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मजूर अडकले होते. स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमी मजूरांना बाहेर काढण्यात आले.

जखमींना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. जखमींमध्ये माणिक पवार, विनायक चौधरी, युवराज गुत्तवार, बंडू कोवासे आणि मल्लेश यांचा समावेश आहे. दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अजून या संदर्भात अधिकृत मिळू शकली नाही . नक्की हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरु झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com