India Pakistan War : 'पाकिस्तान लष्कराचे 35 ते 40 जवान मारले गेले'; डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची माहिती
भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलाने आज, रविवारी पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी डीजीएमओ लेफ्टनंच जनरल राजीव घई यांनी सांगितले की, "दोन्ही देशांमधील सघर्षादरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यातील 35-40 जवान मारले गेले. भारतीय लष्कराने पूर्णपणे आश्चर्यचकित करणारे यश मिळवले. तसेच त्यांनी भारतीय लष्कराच्या कारवाईत 9 दहशतवादी तळांवरील 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले," असेही सांगितले. तसेच, "7 मे रोजी ओळख पटवण्यात आलेल्या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. तसेच त्यांनी सांगितले की भारताने केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले."
एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले की, "भारताने पाकिस्तानच्या महत्त्वांच्या लष्करी मालमत्तांवर हल्ला केला. ज्यामध्ये पश्चिमी आघाडीवरील एअर बेस, कमांड सेंटर्स, लष्करी पायाभूत सुविधा आणि एअर डिफेन्स सिस्टम्स यांचा समावेश होता. ज्या तळांवर आपण हल्ला केला त्यामध्ये इस्लामाबादमध्ये असलेला चकलाला आणि रफिकी यांचा समावेश होता."