Indigo : उड्डाण रद्द प्रकरणात इंडिगोची मोठी कारवाई, चार अधिकारी निलंबित
Indigo Take Big Decision : इंडिगो एअरलाईन्सने गेल्या आठवड्यात झालेल्या गोंधळाबद्दल चार फ्लाइट ऑफिसर्सना निलंबित केले आहे. हे अधिकारी गोंधळासाठी जबाबदार ठरवले गेले आहेत. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांची डीजीसीएने गुरुवारी दोन तास चौकशी केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गेल्या दहा दिवसांपासून इंडिगोच्या सेवा अजूनही सुरळीत झाल्या नाहीत. या दरम्यान, हजारो उड्डाणे रद्द झाली असून, प्रवाशांना खूप त्रास झाला आहे. या त्रासलेल्या प्रवाशांसाठी कंपनीने 10 हजार रुपयांचे अतिरिक्त ट्रॅव्हल व्हाऊचर देण्याची घोषणा केली आहे.
कुठल्या प्रवाशांना मिळणार 10 हजारांचे व्हाऊचर?
3 ते 5 डिसेंबरदरम्यान उड्डाणे रद्द झाल्यामुळे सर्वाधिक त्रास झालेल्या प्रवाशांना 10 हजार रुपयांचे व्हाऊचर मिळणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, उड्डाण रद्द झाल्यानंतर 24 तासांच्या आत मिळणाऱ्या 5 ते 10 हजार रुपयांच्या रिफंडच्या व्यतिरिक्त हे व्हाऊचर दिले जातील. मात्र, जास्त त्रास झालेल्या प्रवाशांची यादी कंपनीने स्पष्ट केलेली नाही. हे व्हाऊचर प्रवाशांना एक वर्षभर वापरता येतील.

