चिंचवडमध्ये कारमध्ये 43 लाखांची रोकड आणि शस्त्र सापडली
Admin

चिंचवडमध्ये कारमध्ये 43 लाखांची रोकड आणि शस्त्र सापडली

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. महाविकास आघाडी आणि भाजपाने आपले उमेदवारी जाहीर केले असून, २६ फेब्रुवारीला या दोन्ही जागेसाठी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर चिंचवडमध्ये कारमध्ये 43 लाखांची रोकड आणि शस्त्र सापडली आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाच्या अधिकारीकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. हे पैसे कुणाचे आहेत. याचा तपास सुरु आहे. पैशांसोबत धारदार शस्त्रेसुद्धा कारमध्ये सापडली आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com