कोल्हापुरात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला महाराष्ट्रातील सर्वाधिक ५१,००० रूपये दर

कोल्हापुरात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला महाराष्ट्रातील सर्वाधिक ५१,००० रूपये दर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा आज दाखल झाला.

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोकणचा राजा अर्थात हापूस आंबा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा आज दाखल झाला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला ५१,००० रुपयांचा दर निघाला. पहिला सौदा अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते काढला.

कोल्हापुरात साधरत: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आंब्याची आवक सुरू होते. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. कुंभारमठ (ता. देवगड) येथील शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांचा हापूस आंबा खासदार धनंजय महाडिक यांनी बोली लावत ५१,००० खरेदी केला असून राज्यातील यावर्षीचा सर्वात उच्चांकी दर हा कोल्हापुरात मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com