Daund,pune
Daund,pune

गंभीर गुन्ह्यात ६ वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद, यवत गुन्हे शोध पथकाची कामगिरी

दौंड ढमे वस्ती येथील खुनासह दरोड्यातील ६ वर्षापासून फरार असलेला दोन आरोपी जेरबंद

विनोद गायकवाड(दौंड) पुणे जिल्ह्यातील यवत गुन्हे शोध पथकाने ढमे वस्ती दौंड येथील सन २०१६ मधील खुनासह दरोड्यातील पाहिजे असलेला आरोपी विठ्ठल उर्फ ठवा अशोक भोसले वय ३५ रा. गणेगाव दुमाला ता.शिरूर जि.पुणे यास मौजे अरण ता.माढा जि. सोलापूर येथून ताब्यात घेतलेचे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

14 नोव्हेंबर रोजी ढमे वस्ती माने हॉस्पिटल दौंड ता.दौंड जि.पुणे येथे अज्ञात ७ ते ८ इसमांनी बारवकर यांचे राहत्या घरी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय झोपले असताना अचानकपणे घराचा दरवाजा तोडून घरात घुसून लोखंडी रॉड व तीक्ष्ण हत्याराने फिर्यादी यांचे डोक्यावर व हातावर मारहाण करून फिर्यादी व त्यांचे पती अनिल भिमराव बारवकर यांना डोक्यावर, मानेवर गंभीर दुखापत करून त्यांचा खुन करून घरातील मौल्यवान चीज वस्तू व सोन्याचे दागिने असा किंमत रूपये १,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळून गेले होते वगैरे मजकुरचा गुन्हा दौंड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता त्यानंतर सदर खुणा सह दरोड्या मध्ये आत्ता पर्यत ६ आरोपी अटक करण्यात आले होते सदरचा गुन्हा घडले पासून निष्पन्न आरोपी नामे विठ्ठल उर्फ ठवा अशोक भोसले हा फरार झाला होता सदरचा आरोपी

कुर्डुवाडी,भूम,परांडा,अरण भागामध्ये राहत असलेची माहिती यवत गुन्हे शोध पथकाला मिळालेने सदर पोलीस पथकाने अरण ता.माढा जि. सोलापूर येथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही साठी दौंड पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आलेले असून सदरचा आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्वयार यवत,बारामती तालुका,पोलीस स्टेशन मध्ये घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असून सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे सो,उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस सो,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम,गुरुनाथ गायकवाड,अक्षय यादव,अजित काळे,गणेश कुतवळ, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांनी केलेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com