Mumbai-Ahmedabad Highway Traffic Jam : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा शाळकरी मुलांच्या सहलीला फटका
थोडक्यात
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अडकलेल्या 6 स्कूल बस
शाळकरी मुलांच्या सहलीला वाहतूक कोंडीचा फटका
नवनीत स्टेशनरी पाहणीसाठी निघालेली बस थेट रिसॉर्टला
(Mumbai-Ahmedabad Highway Traffic Jam) अहमदाबाद महामार्गावर काल प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका शाळकरी मुलांच्या सहलीला बसल्याची माहिती मिळत आहे.
या वाहतूक कोंडीमध्ये 6 स्कूल बस अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेली ही बस नवनीत स्टेशनरी पाहणीसाठी निघालेली मात्र थेट रिसॉर्टला गेल्याची माहिती मिळत असून सकाळी 8 वाजता निघालेली बस 6 तास वाहतूककोंडीतच होती. नवनीतने व्हिजिटसाठी दिलेली 10 वाजताची वेळ चुकल्यामुळे मुलांना रिसॉर्टला नेण्यात आले.
मालाडहून 300 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल निघाली होती. या वाहतूक कोंडीत शाळेच्या बससोबत आपत्कालीन वाहनं, रुग्णवाहिकाही अडकल्या. गुजरात लेनवरील वाहतूक सुरू आहे तर मुंबई लेनवरील वाहतूक अद्याप ही ठप्प असल्याची माहिती मिळत आहे.