बनावट कागदपत्रांच्या आधारे 27 बिल्डरांनी मिळविल्या रेराच्या 68 परवानग्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे 27 बिल्डरांनी मिळविल्या रेराच्या 68 परवानग्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे रेराचे सर्टिर्फिकेट मिळवून सरकारची फसवणू करणाऱ्या 27 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमजद खान, कल्याण

बनावट कागदपत्रांच्या आधारे रेराचे सर्टिर्फिकेट मिळवून सरकारची फसवणू करणाऱ्या 27 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वास्तू विशारद संदीप पाटील यांनी या प्रकरणात तक्रार केली होती. चौकशी अंती केडीएमसीने पोलिस तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाल्यावर एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्रासपणे बेकायदा बांधकामे सुरु आहे. बेकायदा बांधकामाप्रकरणी उच्च न्यायालयाने अनेक वेळा फटकारले आहे. महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. तरीही बेकायदा बांधकामे सुरु आहेत. काही महिन्यापूर्वी वास्तूविशारद संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. तसेच तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना अर्ज दिला होता की, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीत मोठय़ा प्रमाणात महापालिकाचा बनावट परवानगी दाखवून रेराचे सर्टिर्फिकेट मिळविण्यात आले आहे. महापालिकेने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. महापालिकेच्या चौकशीत धक्कादायक बाब उघडीस आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खोट्या सही शिक्क्याचा वापर करुन बनावट रेराकडून 67 सर्टिर्फिकेट मिळविले आहेत.

यामध्ये 27 बिल्डरांचा समावेश आहे. कल्याण ग्रामीण 27 गावात 26 तर डोंबिवलीत 39 परवानग्यांचा समावेश आहे. केडीएमसीचे अधिकारी अतुल पानसरे यांच्या तक्रारीवर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात 27 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या एकूण 68 परवानग्या पोस्ट डॉक्यूमेंट तयार करुन दिल्याचे भासविले आहे. त्या आधारे रेराकडे नोंदणी केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. रेरा आणि महापालिकेत समन्वय असावा. यासाठी रेराठी महापालिकेने लिंक दिली आहे. त्याची शहानिशा करुन रेराने सर्टिर्फिकेट द्यावे असे रेराला सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com