चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन..! संमेलनाची तयारी अंतिम टप्यात

चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन..! संमेलनाची तयारी अंतिम टप्यात

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलनस उद्या पासून प्रारंभ होत आहे.

अनिल ठाकरे, चंद्रपूर: विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलनस उद्या पासून प्रारंभ होत आहे. चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १६, १७ व १८ डिसेंबरला प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि. स. जोग यांचे अध्यक्षतेत स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात सदर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. दरम्यान संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

संमेलनाचे उद्घाटन १६ डिसेंबर २०२२ ला सरदार पटेल महाविद्यालयाच्या संयोजनात ग्रंथदिंडीनंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ६७वे विदर्भ साहित्य संमेलनाचे पुर्वाध्यक्ष डॉ. म.रा.जोशी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. फिरदौस मिर्जा, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई शांताराम पोटदुखे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

संमेलनात ग्रंथप्रदर्शन, शिल्प आणि चित्र यांचे दालन राहणार असून एकुण तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्य आणि संस्कृतीवर विचारमंथन होईल. उद्घाटन समारोप सत्रांसह, कथाकथन, पाच चर्चासत्रे, अनुभकथन, निमंत्रितांचे कविसमेलन चंद्रपूर. गडचिरोली जिल्हयातील कविंचे स्वतंत्र कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि २ नाटके या संमेलनात सादर होतील. १७ डिसेंबर रोजी भानु कुळकर्णी यांच्याद्वारे ”कटयार काळजात घुसली“ हे नाटक सादर केले जाणार आहे. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे हे प्रामुख्याने उपस्थित राहतील १८ डिसेंबर २०२२ रोजी समारोपीय कार्यक्रमाला माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, खासदार बाळु धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली असून माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव तथा संरक्षक प्रशांत पोटदुखे, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संमेलन कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद काटकर यांच्यासह सुर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, वि. सा. संघाचे केंद्रीय सदस्य डॉ. श्याम मोहरकर यांनी संमेलन परिसराचा आढावा घेतला. दरम्यान या संमेलनाला साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com