Big Breaking! आता भारतात 6Gची नवीन लाट; मोठ्या फाईल होणार काही क्षणांत डाऊनलोड
Big Breaking! आता भारतात 6Gची नवीन लाट; मोठ्या फाईल होणार काही क्षणांत डाऊनलोड Big Breaking! आता भारतात 6Gची नवीन लाट; मोठ्या फाईल होणार काही क्षणांत डाऊनलोड

Big Breaking! आता भारतात 6Gची नवीन लाट; मोठ्या फाईल होणार काही क्षणांत डाऊनलोड

Published by :
Riddhi Vanne
Published on

Now a new wave of 6G in India : आता भारतात 5G नंतर 6G चा मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. पण या गोष्टीसाठी आपल्याला थोडी प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये दूरसंचार विभागाचे सचिव नीरज मित्तल यांनी माहिती दिली आहे. हे 6G पुर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI)असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. येत्या दोन वर्षांत या गोष्टीला प्रारंभ होणार आहे. एआयच्या मदतीने 5G पेक्षा 6G अधिक वेगवान असेल. या तंत्रज्ञानामुळे कोणताही चढ-उतार होणार नसल्याने स्पीड एकसारखा असेल. याचा थेट फायदा वापरकर्त्यांना होईल. 6G मध्ये एआयवर आधारित एजेंटिक तंत्रज्ञान वापरण्यात येईल. यामुळे कॉलचा आवाज आणि गुणवत्ता उत्तम असेल, दरम्यान मोठ्या मोठ्या फाईल्स काही सेंकदात डाउनलोड होतील.

एआय भविष्यातील अनेक समस्यांचे सोडवणूक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे तज्ञांचे मत आहे. मात्र, एआयच्या चुकीच्या वापरामुळे धोकेही निर्माण होऊ शकतात. डीपफेक व्हिडिओ, नक्कल केलेले आवाज, आणि ऑनलाइन फसवणुकीला चालना मिळू शकते. त्यामुळे, यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा मानवी जीवनात गंभीर अडचणी येऊ शकतात.

200 कोटींची फसवणूक रोखली

इंटरनेटवरील धोके ओळखून दूरसंचार विभागाने एआय आधारित सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे. यामुळे, ऑनलाइन फसवणूक आणि संशयास्पद व्यवहारांची तपासणी सहजतेने केली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत 200 कोटी रुपयांची फसवणूक टाळली गेली आहे, तसेच 48 लाखांहून अधिक बोगस व्यवहार थांबवले आहेत.

भारताची 6G आणि एआय क्षेत्रात वाढ

भारत सरकारने एआयच्या प्रगतीसाठी 1.25 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. यामुळे एआय संशोधन आणि स्टार्टअप्सना बळकटी मिळणार आहे. लवकरच भारत 6G आणि एआय क्षेत्रात जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास सचिव नीरज मित्तल यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com