Kashmir : काश्मीरमधील 7 पर्यटनस्थळे पुन्हा खुली
थोडक्यात
पहलगामच्या येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता
काश्मीर आणि जम्मूमधील पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला
काश्मीरमधील 7 पर्यटनस्थळे पुन्हा खुली
(Kashmir) पहलगामच्या येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर काश्मीर आणि जम्मूमधील पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आता काश्मीरमधील 7 पर्यटनस्थळे पुन्हा खुली करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
या सात पर्यटनस्थळांमध्ये आडू व्हॅली, राफ्टिंग पॉइंट यन्नर, अक्कड पार्क, पादशाही पार्क, कमान पोस्ट, जम्मूमधील डगन टॉप, घग्गर, शिव गुफा यांचा समावेश असून यामध्ये मात्र पहलगामचे नाव नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पहलगाम अजून तरी बंदच राहणार आहे.