राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा काल (बुधवारी) लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं 700 जणांची प्रकृती बिघडली. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com