7th Pay Commission:  निवडणुकीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, 'या' 6 भत्त्यांमध्ये होणार मोठे बदल

7th Pay Commission: निवडणुकीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, 'या' 6 भत्त्यांमध्ये होणार मोठे बदल

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
shweta walge

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने जानेवारी ते जून 2024 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीमुळे महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या नुकत्याच प्रसिद्ध केल्या आहेत.

केंद्र सरकारकडून चाईल्ड एज्युकेशन भत्ता, जोखीम भत्ता, नाईट ड्युटी भत्ता (एनडीए), ओव्हर टाइम भत्ता (ओटीए), संसद सहाय्यकांना दिला जाणारा विशेष भत्ता आणि अपंग महिलांना मुलांची काळजी घेण्यासाठी दिले जाणारे विशेष भत्ते या 6 भत्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) 2 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार

जोखीम भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या जोखीम भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे. धोकादायक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो. त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असलेल्या कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता मिळतो.

नाईट ड्युटी भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये नाईट ड्युटी भत्त्यातही सुधारणा करण्यात आली आहे. जर केंद्रीय कर्मचारी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ड्युटीवर असतील त्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे.

बालशिक्षण भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झाल्यामुळे बालशिक्षण भत्ता 25 टक्के झाला आहे. ज्यांना दोन मुले आहेत त्यांना या भत्त्याचा लाभ मिळणार आहे. ते बालशिक्षण भत्ता किंवा वसतिगृह अनुदानाचा दावा करू शकतात. वसतिगृहाचे अनुदान 6750 रुपये प्रति महिना आहे. अपंग मुले असतील तर बालशिक्षण भत्ता दुप्पट होईल.

ओव्हरटाइम भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करताना, ओव्हर टाइम अलाउंस (ओटीए) मध्येही बदल करण्यात आला आहे.

अपंग महिला कर्मचाऱ्यांना भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करताना, अपंग महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बाल संगोपनासाठीच्या विशेष भत्त्यातही बदल करण्यात आला आहे.

संसदीय सहाय्यक भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये, संसद सहाय्यकांना देय असलेल्या विशेष भत्त्यातही बदल करण्यात आला आहे.

7th Pay Commission:  निवडणुकीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, 'या' 6 भत्त्यांमध्ये होणार मोठे बदल
Congress On Sanjay Raut | राऊतांच्या सांगली दौऱ्यावर काँग्रेसची टीका | Lokshahi Marathi
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com