Weather Update : अकोला जिल्ह्यातील हातरूण गावात भिंत कोसळून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू
Weather Update : अकोला जिल्ह्यातील हातरूण गावात भिंत कोसळून 8 वर्षीय मुलाचा मृत्यूWeather Update : अकोला जिल्ह्यातील हातरूण गावात भिंत कोसळून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू

Weather Update : अकोला जिल्ह्यातील हातरूण गावात भिंत कोसळून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू

गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्या सह सर्वत्र अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच बाळापूर तालुक्यातील हातरूण गावात आज एक हृदयद्रावक घटना घडली. ती म्हणजे घराची भिंत कोसळून एका निष्पाप ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्या सह सर्वत्र अवकाळी पाऊस पडत आहे.

  • अशातच बाळापूर तालुक्यातील हातरूण गावात आज एक हृदयद्रावक घटना घडली.

  • मधुकर नारायण गावंडे यांच्याजवळून जात असतांना त्यांच्या घराची भिंत अचानक कोसळली.

प्रतिनिधी - अमोल नांदूरकर अकोला

गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्या सह सर्वत्र अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच बाळापूर तालुक्यातील हातरूण गावात आज एक हृदयद्रावक घटना घडली. ती म्हणजे घराची भिंत कोसळून एका निष्पाप ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

शेख हसनैन शेख बिस्मिल्लाह कुरेशी असं या मुलाचे नाव असून तो मधुकर नारायण गावंडे यांच्याजवळून जात असतांना त्यांच्या घराची भिंत अचानक कोसळली त्यासाठी परिसरातील आणि गावातील लोक मदतीसाठी धावले आणि त्यांला गंभीर अवस्थेत तातडीने बाहेर काढले आणि गावातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र शेख हसनैन यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे हातरुण गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com