LinkedIn : करियरमध्ये पुढे जाण्याऐवजी 84% प्रोफेशनल्स थांबले… LinkedIn अहवालातील धक्कादायक माहिती समोर
Job Market and Recruitment Trends: 2026 च्या उंबरठ्यावर भारतातील नोकरी बाजार अधिकच कठीण होत चालला आहे. बहुतांश व्यावसायिक नवीन संधी शोधण्याच्या तयारीत असले, तरी स्पर्धा वाढणे, योग्य पद न मिळण्याची भीती आणि कौशल्यांतील बदल यामुळे हा प्रवास अवघड वाटत आहे.
विविध वयोगटांतील कर्मचारी, अनुभवी असोत वा तरुण—एआयवर आधारित भरती पद्धतींबाबत संभ्रमात आहेत. तरीही अनेकजण सीव्ही तयार करणे, मुलाखतीची तयारी आणि माहिती मिळवण्यासाठी एआय साधनांचा आधार घेत आहेत. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचेही दिसते.
लिंक्डइनच्या अभ्यासानुसार, आज एका पदासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे निवड होणे कठीण बनले आहे. उमेदवारांनाच नव्हे, तर योग्य टॅलेंट शोधताना रिक्रूटर्सनाही अडचणी येत आहेत.
या परिस्थितीत अनेक जण करिअरची दिशा बदलत आहेत. काहीजण नव्या क्षेत्रांकडे वळत आहेत, तर काही उद्योजकतेचा मार्ग निवडत आहेत. एकूणच, बदलत्या कौशल्यांची तयारी, योग्य नेटवर्क आणि स्मार्ट टूल्स यांशिवाय 2026 च्या नोकरी बाजारात टिकणे आव्हानात्मक ठरणार आहे.

