8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात होऊ शकते 40-50 टक्क्यांनी; जाणून घ्या कसे...
देशभरातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आठव्या वेतन आयोगात त्यांना मिळणाऱ्या पगारवाढीची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली होती. मागील वेतन आयोगात, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पगारात चांगली वाढ झाली होती. तर आठव्या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे, त्यांना पुन्हा त्यांच्या गणनेत चांगली वाढ अपेक्षित आहे. एकदा लागू झाल्यानंतर, आठव्या वेतन आयोगाचा फायदा 36 लाखांहून अधिक केंद्र सरकारी नागरी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना होईल.
नवीन वेतन आयोगामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी चांगली वाढ होऊ शकते. 8 व्या वेतन आयोगाअंतर्गत, फिटमेंट फॅक्टर 2.28 आणि 2.86 च्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. यामुळे मूळ पगारात 40-50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
काही तज्ञांनी याबाबत सांगितले होते की, सरकारी कर्मचाऱ्याचा मूळ पगार 46,600 ते 57,200 रुपयांपर्यंत वाढू शकतो. जर फिटमेंट फॅक्टर 2.28 आणि 2.86 च्या दरम्यान असेल. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, फिटमेंट फॅक्टर हा एक मेट्रिक आहे. जो सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन बेसिक पगाराची गणना करण्यासाठी निश्चित गुणक वापरून वापरला जातो.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची (सीपीसी) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारला अहवाल सादर करण्यासाठी निश्चित केलेली वेळ "योग्य वेळी ठरवली जाईल" असे सांगितले.