भारतीय वायुसेनेचा आज 90 वा वर्धापन दिन

भारतीय वायुसेनेचा आज 90 वा वर्धापन दिन

भारतीय वायुसेना 8 ऑक्टोबर 2022 रोजी वायुसेना दिन साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय वायुसेनेने शेजारील पाकिस्तानसोबतच्या चार युद्धांमध्ये आणि चीनसोबतच्या एका युद्धात योगदान दिले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारतीय वायुसेना 8 ऑक्टोबर 2022 रोजी वायुसेना दिन साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय वायुसेनेने शेजारील पाकिस्तानसोबतच्या चार युद्धांमध्ये आणि चीनसोबतच्या एका युद्धात योगदान दिले आहे. आतापर्यंत त्याने अनेक प्रमुख मोहिमा पार पाडल्या आहेत. ज्यात ऑपरेशन विजय - गोव्याचे अधिग्रहण, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन कॅक्टस आणि ऑपरेशन पुमलाई यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त भारतीय वायुसेना देखील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेचा सक्रिय भाग आहे. भारतीय हवाई दल आपला 90 वा वायुसेना दिन साजरा करत आहे.

चंदीगडच्या प्रसिद्ध सुखना तलाव येथील आकाशात वायु सेनेची शक्ती दिसणार आहे, आज सकाळी चंदीगड हवाई तळावर परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी परेडची सलामी घेतील आणि जवानांना संबोधित करतील. तसेच एअर बेसवर हेलिकॉप्टरच्या दोन फॉर्मेशनचा फ्लाय पास्टही होणार आहे. याशिवाय हवाई दलातील जवानांना शौर्य पदके देण्यात येणार आहेत. या विशेष प्रसंगी वायु सेनेचे प्रमुख हवाई दलाच्या नवीन लढाऊ गणवेशाचेही प्रकाशन करतील. ज्याची गर्जना चीनच्या सीमेपासून ते पाकिस्तानपर्यंत ऐकू येईल. यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com