अहमदनगरमध्ये 5 वर्षीय मुलाचा बोअरवेलमध्ये पडल्यानं मृत्यू
Admin

अहमदनगरमध्ये 5 वर्षीय मुलाचा बोअरवेलमध्ये पडल्यानं मृत्यू

अहमदनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडल्यानं 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अहमदनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडल्यानं 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा खेळताना सोमवारी (13 मार्च) सायंकाळी सहा वाजता पडला. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. एनडीआरएफच्या पाच पथकाकडून हे बचाव कार्य सुरु होते.

मात्र रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले, त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. तब्बल साडे आठ तास हा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकला होता. 11 फूट खाली अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी NDRH च्या पाच पथकांनी प्रयत्न केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com