Mumbai BMC : मॅनहोलभोवती पहारा देणारा 'BMC' चा सुपरमॅन; मुंबईकरांच्या काळजीपोटी भरपावसात पहारा

आज मुसळधार पावसामुळे दादरच्या भागात पाणी भरलेले असताना मुंबईकरांच्या काळजीपोटी बीएमसी कर्मचाऱ्याने पहारा दिला आहे.
Published by :
Prachi Nate

मुंबईत गेल्या काही तासांपासून मुसळधारर पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पुढील 3 तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. हवामान खात्याकडून पुढील काही तास मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तावली जात आहे.

अशातच आज मुसळधार पावसामुळे दादर- हिंदुकॉलनीतील भागात पाणी भरले होते. पाण्याचा निचरा होण्याकरता पालिकेकडून मॅनहोलची झाकणे उघडण्यात आली होती. मात्र अनवधानानं उघड्या मॅनहोलमध्ये पडुन अनेकदा जीवघेणे अपघात होतात.

त्यामुळे, उघड्या मॅनहोलच्या आजुबाजूनं जाणाऱ्या मुंबईकरांना सावध करण्यासाठी बीएमसी कर्मचाऱ्यानं मॅनहोलच्या झाकणावरच बसून पहारा दिला आहे. मुसळधार पावसात स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुंबईकरांच्या सुरक्षेकरता मॅनहोलभोवती पहारा देणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पालिकेच्या या कर्मचाऱ्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com