सहलीवरुन परत येणाऱ्या बसचा माणगाव - रायगड रस्त्यावर भीषण अपघात, 10जण जखमी

सहलीवरुन परत येणाऱ्या बसचा माणगाव - रायगड रस्त्यावर भीषण अपघात, 10जण जखमी

माणगाव - रायगड रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

माणगाव - रायगड रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बस सहलीवरुन परत येत असताना या बसचा अपघात झाल्याचे समजते. ही बस सुमारे 10 ते 15 फूट खाली कोसळली आहे. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घ्यायला आले होते. आज सायंकाळच्या सुमारास परतीच्या मार्गावर असताना किल्ले रायगड ते निजामपूर मार्गावरील घरोशीवाडीनजीक या बसचा अपघात झाला. यावेळी, अवघड वळणावर बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याखाली सुमारे 10 ते 15 फूट कोसळली. यामुळं या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

हे प्रवासी पुण्यातील निगडीचे असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com