बच्चू कडूंनी तलवारीने कापला केक; भाजपाची जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार

बच्चू कडूंनी तलवारीने कापला केक; भाजपाची जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार

माजी मंत्री व शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सुरज दहाट, अमरावती

माजी मंत्री व शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे, बच्चू कडू यांनी वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. बच्चू कडू यांचा हा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल व्हायरल झाला आहे. तर हा व्हिडीओ ५जुलै २०१९चा असल्याची माहिती आहे,बच्चू कडू यांनी सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना धारधार शस्त्र वापरल्याचा आरोप भाजप नेत्याकडून करण्यात येत आहे.

यामुळे बच्चू कडू यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. भाजप नेते माजी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे,बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी गोपाल तिरमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तिरमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केल्यानंतर पोलीस हे बच्चू कडू यांच्यावर कारवाई करणार का ? हे पाहावे लागणार आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com