Beed Walmik Karad : "वाल्मीक अण्णांच्या विरोधात पोस्ट केली तर....तुझी..." बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकाकडून तरूणाला धमकी
वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून एसआयटीने वाल्मीक करायला घोषित केले आहे त्यामुळे एसआयटीने न्यायालयाकडे वाल्मीक कराची संपत्ती जप्त करण्यासाठी चा अर्ज केला.
अशातच बीडमध्ये वाल्मीक कराड समर्थकांकडून तरूणाला धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. वाल्मीक अण्णांच्या विरोधात तु पोस्ट करायची नाही म्हणत वाल्मीक कराड समर्थकांकडून अश्लील शिवीगाळ करण्यात आली आहे.
पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील वाल्मीक कराडचे समर्थक प्रशांत गर्जे आणि महेश सानप यांनी इंदौर येथील संतोष शिंदे नामक एका तरुणाला धमकीचा कॉल केला आणि त्याला शिवीगाळ करायला लागले.
सदरील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असुन हि धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात पोलिसांत अद्याप कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही. तसेच लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.