नकली मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल
Team Lokshahi

नकली मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल

नकली मुख्यमंत्रीवर म्हणजेच विजय मानेवर गुन्हा दाखल झाला आहे

नुकताच काही दिवसापासून नकली मुखयमंत्री फेमस होत होते.पण आता त्याच नकली मुख्यमंत्रीवर म्हणजेच विजय मानेवर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करून विजय माने यांनी अनेक ठिकाणी नृत्य केल्याचा सुद्धा आरोप होत आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा समाजामध्ये मलिन केल्याप्रकरणी हा विजय मानेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनेक महिन्यापासून विजय माने हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखा वेशभूषा करून समाजातील अनेक सार्वजनिक ठिकाणी शिंदे यांची कॉपी करत करत धुमाकुळ घालत होता. याचप्रकरणी तोतयावर पुण्यातील बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय नंदकुमार माने यांच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (Information Technology Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com