Sanjay Raut : पीडित मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
Admin

Sanjay Raut : पीडित मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

पीडित मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पीडित मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत होती. भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांकडे कारवाईचा मागणी केली होती.

राऊत यांनी ट्विट करुन म्हटले होते की, देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com