Jitendra Awhad
Jitendra Awhad Team Lokshahi

पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली.

महेश आहेर यांना तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव आहेत. नौपाडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भादंवी कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब), या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी महेश आहेर यांना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आहेर यांना मारहाण केली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com