Pune Crime : पुण्यात काळीमा फासणारी बातमी!
Pune Crime : पुण्यात काळीमा फासणारी बातमी! मुल होत नाही म्हणून सासऱ्यांने ठेवला सूनेसोबत शरीरिक संबंध Pune Crime : पुण्यात काळीमा फासणारी बातमी! मुल होत नाही म्हणून सासऱ्यांने ठेवला सूनेसोबत शरीरिक संबंध

Pune Crime : पुण्यात काळीमा फासणारी बातमी! मुल होत नाही म्हणून सासऱ्यांने ठेवला सूनेसोबत शरीरिक संबंध

पुणे शहरातील सहकारनगर परिसरात एका निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने नवविवाहित सुनेवर अनुचित दबाव टाकल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

पुण्यात काळीमा फासणारी घटना घडली आहे.

एका निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने नवविवाहित सुनेवर अनुचित दबाव टाकल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नानंतर तिला तिचा पती अपत्याला जन्म देऊ शकत नाही.

Pune Crime : पुणे शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सहकारनगर परिसरात एका निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने नवविवाहित सुनेवर अनुचित दबाव टाकल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका 35 वर्षीय पुरुषाशी महिन्याभरापूर्वी विवाहबद्ध झाली होती. लग्नानंतर तिला तिचा पती अपत्याला जन्म देऊ शकत नाही, ही बाब आरोपींनी सांगितली. त्यानंतर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने थेट सुनेच्या खोलीत जाऊन स्वतःकडून अपत्य होण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे.

महिलेने तत्काळ या अशोभनीय गोष्टीला नकार देत स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून आरोपी निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, त्यांची पत्नी तसेच पतीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीनेच अशा प्रकारे वागल्याने समाजात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. सहकारनगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com