North India Snowfall : उत्तर भारत गारठला
North India Snowfall : उत्तर भारत गारठलाNorth India Snowfall : उत्तर भारत गारठला

North India Snowfall : उत्तर भारत गारठला; डोंगरदऱ्यांत बर्फाची चादर, जनजीवन ठप्प

गेल्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल जाणवत आहे. अनेक भागांत तापमान घसरले असून थंडी वाढली आहे. नवीन वर्षाच्या आधी उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात थंडी आणि धुक्याचा जोर वाढला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

गेल्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल जाणवत आहे. अनेक भागांत तापमान घसरले असून थंडी वाढली आहे. नवीन वर्षाच्या आधी उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात थंडी आणि धुक्याचा जोर वाढला आहे. या परिस्थितीचा दैनंदिन जीवनावर, प्रवासावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. सध्या तरी या थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

देशातील अनेक भागांत सकाळी आणि रात्री दाट धुके राहणार आहे. नवीन वर्षापर्यंत थंडी अधिक वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हिमालयीन भागात बर्फ पडत असून मैदानी प्रदेशात धुक्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये १ जानेवारीपर्यंत दाट धुके राहण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ३० डिसेंबरपर्यंत, बिहारमध्ये २७ डिसेंबरपर्यंत, तर आसाम आणि मेघालयात २६ डिसेंबरपर्यंत धुक्याचा प्रभाव राहणार आहे. काही राज्यांमध्ये ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते.

पिंपरी-चिंचवडमध्ये शाळांच्या वेळा बदलल्या

थंडी वाढल्याने आणि लवकर अंधार पडत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने शाळांच्या वेळेत बदल केला आहे. आता सर्व महापालिकेच्या शाळा सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भरतील.

पुण्यात थंडीचा उच्चांक

पुण्यात यंदा थंडी जास्त जाणवत आहे. डिसेंबर महिन्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. २३ दिवसांत १३ दिवस तापमान एक अंकी राहिले असून यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड ठरला आहे.

थोडक्यात

  1. गेल्या काही दिवसांत हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत

  2. अनेक भागांत तापमानात मोठी घसरण होऊन थंडी वाढली आहे

  3. नवीन वर्षाच्या आधी उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात थंडी व धुक्याचा जोर

  4. या हवामान बदलाचा दैनंदिन जीवनावर परिणाम

  5. प्रवास सेवांवर थंडी व धुक्याचा परिणाम जाणवत आहे

  6. आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता

  7. सध्या तरी थंडीपासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com