ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या काही तास आधीच नारायण राणे यांचा आजचा कोकण दौरा रद्द

ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या काही तास आधीच नारायण राणे यांचा आजचा कोकण दौरा रद्द

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत. आज उद्धव ठाकरे बारसूमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. नारायण राणेसुध्दा आज बारसूला येणार होते.

मात्र नारायण राणेंचा कोकण दौरा रद्द झाला आहे. एका माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पुढच्या आठवड्यात मी रत्नागिरीमध्ये जाऊन जाहीर सभा आणि बैठक घेणार आहे. तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर करेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com