Panvel
Panvel

Panvel : मैत्रिणीनेच केली मैत्रिणीच्या घरी सोन्याची चोरी; आरोपी महिलेला पोलिसांनी केली अटक

मैत्रीवर विश्वास ठेवणं एका महिलेवर चांगलंच महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Panvel) मैत्रीवर विश्वास ठेवणं एका महिलेवर चांगलंच महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे. पनवेलमधील कामोठे परिसरात मैत्रिणीनेच चक्क तिच्या मैत्रिणीच्या घरातच सोन्याची चोरी केल्याची माहिती मिळत आहे. सविता हिने बाजारात जाताना तिच्या समोर राहणारी मैत्रीण मोनिका हिला घराची चावी दिली होती. परंतु सविता परत आल्यावर तिला धक्का बसला. घरातील सोन्याचे दागिने गायब होते, आणि दरवाजाला पूर्वीसारखंच कुलूप लावलेलं होतं.

सुरुवातीला मोनिका हिने घरात गेल्याचं नाकारलं. त्यामुळे सविताने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं मात्र त्यात काहीच दिसले नाही. त्यानंतर तो सीसीटीव्ही पुढील तपासणीसाठी पाठवला असता तपासात डीव्हीआरशी छेडछाड झाल्याचं समोर आलं.

यावर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मोनिका दिघे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून सर्व सोनं जप्त केलं आहे. कोर्टाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Summery

  • मैत्रिणीनेच केली मैत्रिणीच्या घरी सोन्याची चोरी

  • पनवेलमधील कामोठे परिसरातील घटना

  • आरोपी महिलेला पोलिसांनी केली अटक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com