Ajit Pawar
ताज्या बातम्या
Ajit Pawar : बारामतीत अजित पवार यांचं भव्य म्युझियम होणार; अपघातावेळी अजित पवारांजवळ असलेल्या वस्तू म्युझियममध्ये ठेवण्यात येणार
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता बारामतीत अजित पवार यांचं भव्य म्युझियम होणार असून अपघातावेळी अजित पवारांजवळ असलेल्या वस्तू या म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
Summary
बारामतीत अजित पवार यांचं भव्य म्युझियम होणार
विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात स्मारक उभारण्यात येणार
म्युझियममध्ये अपघातावेळी अजित पवारांजवळ असलेल्या वस्तू ठेवण्यात येणार
