Thane Fire : ठाण्यातील 18-मजली इमारतीत भीषण आग; 70 रहिवासी सुखरूप बाहेर काढले
ठाण्यातील शास्त्री नगर परिसरात आज पहाटे मोठी आग लागल्याची घटना घडली. मिलन हिल नावाच्या 18 मजली इमारतीत पहाटे चारच्या सुमारास अचानक धुराचे लोट पसरले आणि एकच गोंधळ उडाला. दहाव्या मजल्याजवळील विजेच्या वायरमध्ये बिघाड झाल्याने ही आग भडकली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीमुळे इमारतीत अडकलेल्या सुमारे 70 रहिवाशांना अग्निशमन दलाने वेळेत बाहेर काढले. या घटनेत दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही फ्लॅट्सचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली. आग आटोक्यात आणण्यात यश आले असून नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
थोडक्यात
ठाण्यातील शास्त्री नगर परिसरात पहाटे मोठी आग लागली.
मिलन हिल नामक 18-मजली इमारतीत ही घटना घडली.
आग पहाटे सुमारे ४ वाजता सुरू झाली, धुराचे लोट पसरल्याने गोंधळ उडाला.
प्राथमिक माहितीनुसार, दहाव्या मजल्याजवळील विजेच्या वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे आग भडकली.
मोठ्या नुकसानाची भीती असून बचावकार्य सुरू आहे.

