Gautam Adani meets Sharad Pawar : सिल्व्हर ओकवर मोठी भेट! गौतम अदानी शरद पवारांच्या दारी, नेमकं काय शिजतंय?
उद्योगपती गौतम अदानी आज शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही भेट सांत्वनासाठी असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार आजच बारामतीहून मुंबईत आले होते आणि त्यानंतर लगेचच अदानी यांनी त्यांची भेट घेतली.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण वेगाने बदलत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर अदानी–पवार भेटीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.
दरम्यान, अलीकडेच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपणास याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असं स्पष्ट केलं होतं. तसेच १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार होते, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
थोडक्यात
उद्योगपती गौतम अदानी आज शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही भेट सांत्वनासाठी असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार आजच बारामतीहून मुंबईत आले होते.
त्यानंतर लगेचच अदानी यांनी त्यांची भेट घेतली.

