Iran - Israel Conflict News : इस्त्रायल-इराणमध्ये युद्धाचा भडका, कोणत्या देशाचा कोणाला पाठिंबा?

इस्त्रायल-इराण युद्ध: तेहरानमध्ये स्फोट, आंतरराष्ट्रीय पातळीवर देश दोन गटात विभागले.
Published by :
Team Lokshahi

जगाच्या राजकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या घडामोडीमध्ये, इस्त्रायल आणि इराण यांच्यात थेट युद्ध सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट झाल्याने धुराचे लोट पसरले असून, प्राथमिक माहितीनुसार इराणचे 'विस कमांडर' ठार झाले आहेत, तसेच सहा अणुशास्त्रज्ञांनाही जीव गमवावा लागल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, इस्त्रायलने "रायझिंग लँड ऑपरेशन" नावाची मोठी सैनिकी कारवाई सुरू केल्याची माहिती मिळत आहे. पाठींबा देणाऱ्या देशांमध्ये दोन बाजूंमध्ये विभागणी केली आहे.

या संघर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर देश दोन गटात विभागले गेले आहेत –

इस्त्रायलला पाठिंबा देणारे देश:

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, चेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड.

इराणला पाठिंबा देणारे देश:

रशिया, चीन, इजिप्त, तुर्की, पाकिस्तान, इंडोनेशिया, इराक, ओमान, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, लिबनॉन, जॉर्डन, हौथी, हमास आणि अफगाणिस्तान.

मध्यस्थीचे प्रयत्न सुरू

या गंभीर परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघ, भारत, जपान, आयर्लंड, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन आणि इटली हे देश शांतता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, दोन्ही देशांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता युद्ध थांबवणे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय परिणामांची संभाव्य शक्यता

या युद्धामुळे जागतिक तेलविक्री, व्यापार, गुंतवणूक आणि शस्त्रास्त्र बाजारात मोठा अस्थिरतेचा काळ येऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, या संघर्षात आण्विक शस्त्रांचा धोका निर्माण झाल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण जग या संघर्षाकडे भीतीने पाहत आहे आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com